सप्टेंबर अखेरीसही अकरावी ऑनलाइन प्रवेश सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉलेजचे प्रथम सत्र संपण्यास एक महिना शिल्लक राहिला असतानाही अकरावी ऑनलाइन प्रवेश अद्याप सुरूच आहेत. प्रवेशापासून वंचित असलेल्या तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ फेरीचा तिसरा टप्पा सोमवार, 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची ही शेवटची संधी असेल, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

तिसऱया टप्प्यातील प्रवेशात प्रथम प्राधान्य 35 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्यानंतर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी अद्याप 24 हजार 932 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. मुंबई विभागात अकरावीच्या 84 हजार 411 जागा रिक्त असून या जागांवर प्रवेश देण्यासाठी ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ फेरी राबविण्यात येणार आहे. अकरावीच्या तीन नियमित फेऱया, एक विशेष फेरी, दोन प्रथम येणाऱयास ‘प्रथम प्राधान्य’ फेरी आणि इनहाऊस, मॅनेजमेंट आणि अल्पसंख्याक कोटय़ातून आतापर्यंत 2 लाख 12 हजार 591 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश घेतला आहे.

प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक
23 ते 26 सप्टेंबर – नावनोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणे
26 सप्टेंबर – रिक्त जागा जाहीर
27 सप्टेंबर – 35 टक्के व त्यापेक्षा जास्त गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
27 ते 28 सप्टेंबर – संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे
28 सप्टेंबर – रिक्त जागा जाहीर
30 सप्टेंबर – एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर – संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे