गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, बंदूक-काडतूसं जप्त

gadchiroli-naxal

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तासभर चकमक सुरू होती. कुरखेडा तालुक्यात खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगलात ही चकमक झाली. नक्षल सप्ताहानिमित्त 60-70 नक्षलवादी तिथे एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून सी-60 तुकडीच्या पोलिसांनी हे अभियान राबवले.

पोलीस येताच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहता नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळी बंदुकीसह काडतुसे, मॅगझिन, 3 प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल इत्यादी साहित्य सापडले. एक नक्षलवादी जखमी झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना रविवारी सकाळी 7 च्या सुमारास घडल्याचं कळतं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या