
फेसबुक युजर्सला लवकर एक मजेशीर नवे फीचर मिळणार आहे. यामध्ये युजर्स एकाच फेसबुक अकाऊंटमधून पाच प्रोफाईल बनवू शकतील. सध्या या फीचरची चाचणी घेतली जात आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक पाच प्रोफाईलचा पर्याय देणार आहे. खरं तर अनेक प्रोफाईलचा पर्याय फेसबुक पूर्वीपासून देत आहे. मात्र तो मर्यादित स्वरूपात होता. नवी प्रोफाईल बनवताना युजर्सला खरे नाव सांगण्याचीही गरज नाही. ओळख लपवून कोणत्याही पोस्टवर कमेंट करण्याची सोयही आहे.

























































