‘गायतोंडे’ ग्रंथ आता हिंदीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानातील अमूर्तवादी शैलीचे ख्यातनाम चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील ‘गायतोंडे’ ग्रंथ आता हिंदीत प्रसिद्ध होणार आहे. गायतोंडे यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढच्या पिढीपर्यंत होण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रंथाची हिंदी आवृत्ती शनिवारी, 6 एप्रिल रोजी नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टच्या सभागृहात सायंकाळी 4 वाजता ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.1983 साली गायतोंडे यांच्यावरचा पहिला मोनोग्राम ललित कला अकादमीने प्रसिद्ध केला होता. ‘चिन्ह’ ने संपादित केलेल्या ‘गायतोंडे’ या मराठी ग्रंथाची हिंदी आवृत्ती ललित कला अकादमीने काढली आहे. आता हा ग्रंथ हिंदीत प्रकाशित होणार आहे. गंथ 224 पानांचा असून पूर्ण रंगीत आहे. मूळ मराठी ग्रंथापेक्षा हिंदी आवृत्तीत गायतोंडे यांची 25 ते 30 नवीन पेंटिग्ज समाविष्ट करण्यात आली आहेत. ग्रंथाचा हिंदी अनुवाद स्मिता दाते यांनी केला आहे.