
पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समितीवर वारकरी सांप्रदायाचा एक प्रतिनिधी नेमण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे. वारकरी सांप्रदायाच्या सदस्यांची निवड केल्यास राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांबाबत वेळोवेळी सूचना सादर करता येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील मागणी केली. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे व यवतमाळच्या खासदार भावना गवळी उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात व लगतच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून लाखो वारकरी, भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी व कीर्तिकी वारीसाठी येत असतात. त्यांना भेडसावणाऱया समस्यांबाबत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ंिदडी समाज यांच्या पदाधिकाऱयांनी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या समस्यांपैकी विशेषतः सासवड, फलटण राष्ट्रीय महामार्गावरील कराह नदीवरील पुलाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने चालू असून जुन्या पुलाचा वापर करावा लागतो, त्यामुळे वाहतूक काsंडी होते तसेच सदर जुना पूल हा अत्यंत मोडकळीस आला असल्यामुळे भविष्यात दुर्घटनाही होऊ शकते. याकडे त्यांनी लक्ष वेधले.


























































