
सामना ऑनलाईन, बहराईच
उत्तर प्रदेशमधील बहराईच येथील १४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत मुलीने केलेल्या तक्रारीवरून तीन अज्ञांताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सलग ८ दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच या संबंधी पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आरोपींनी अपहरण करताना आपली दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढला. ही माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली तेव्हा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आरोपी हे श्रावस्ती जनपदचे राहणारे असल्याचे त्यांनी सांगिले. पोलिसांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळले असून आरोपी ही पिडितेच्या ओळखीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडित मुलीच्या बहिणीच्या जिथे सासर आहे, त्याच गावात हे आरोपी राहत होते. त्यामुळे त्या मुलीची आणि आरोपीची पूर्वीपासून ओळख होती. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपींना शोधण्यासही त्यांनी सुरूवात केली आहे.
























































