देवगड – सिलेंडरच्या स्फोटात नवरा बायको भाजले, घराचेही मोठे नुकसान

प्रतिकात्मक छायाचित्र

देवगड तालुक्यातील दाभोळे मधलीवाडी येथे सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कृष्णा घाडी आणि त्यांची पत्नी वृषाली घाडी हे जखमी झाले आहेत. या स्फोटात घाडी यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे. कृष्णा घाडी हे घरात आणलेला नवीन सिलेंडर लावत होते. सिलेंडर लावत असतानात स्फोट झाला. घाडी यांच्या घरात आग लागल्याचे कळाल्याने आसपासच्या लोकांनी घराकडे धाव घेत पहिले सिलेंडर ओढत घराबाहेर काढला. इतरांनी जखमी दांम्पत्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. या नवरा बायकोला पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या