
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जय श्री रामच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला प्राध्यापकाने रोखल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या महिला प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबद इथल्या एका महाविद्यालयात घडली आहे.
येथील एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने गाणं सादर करण्यापूर्वी जय श्री राम असं म्हटलं. त्याच्या या घोषणेवर आक्षेप घेत एका महिला प्राध्यापकाने त्याला गाणं सादर करण्यापासून रोखलं आणि तिथून खाली उतरायला सांगितलं. हा एक महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रम असून त्यात राजकीय अजेंडा नको, असा या प्राध्यापिकेचा आक्षेप होता. त्यावर त्याने त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांमधून आधी या घोषणा झाल्याचं आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून आपण घोषणा दिल्याचं म्हटलं मात्र, प्राध्यापिकेने त्याला गाणं गाऊ दिलं नाही.
ABES कॉलेज में छात्र ने जय श्रीराम के नारे लगाए तो टीचर ने स्टेज से उतार दिया. टीचर ने कहा कि कोई कीर्तन नहीं हो रहा.#Ghaziabad #ABEScollege, pic.twitter.com/OJKeJRBdwp
— Shyamji Tiwari (@M_ShyamJi) October 20, 2023
या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाविद्यालयावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली. महाविद्यालयाने या प्रकाराची पडताळणी करून दोन प्राध्यापिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. प्राध्यापिका ममता गौतम आणि डॉ. श्वेता शर्मा अशी या प्राध्यापिकांची नावं आहेत.
या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर प्राध्यापिकेवर कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर पोलीस आयुक्तालयानेही याची दखल घेतली होती.




























































