गाझियाबादच्या क्लिनिकमध्ये डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर आले होते रुग्ण बनून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्ण बनून आलेल्या हल्लेखोरांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून हत्या केली. ही घटना गाझियाबादच्या मुरादनगरमध्ये शनिवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शववित्छेदनासाठी पाठवला.

गाझियाबाद पोलिसांच्या माहितीनुसार, मुरादनगर कस्बेमध्ये आयुर्वेदीक डॉक्टर शमशाद यांचे घर आहे. त्याने आपल्या घराच्या बाहेरील भागात क्लिनिक आहे. शनिवारी रात्री जवळपास 10 वाजता आपल्या क्लिनिकमध्ये बसले होते. याच दरम्यान बाइकवर काही लोकं केबिनमध्ये घुसले. त्यांनी स्वत:ला रुग्ण असल्याचे सांगून उपचार करायचे आहेत असे सांगितले. अचानक डॉक्टरवर फायरिंग केली. यामध्ये डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला आणि मारेकरी बाईकवर बसून पळून गेला. तर गोळीबाराचा आवाज ऐकून डॉक्टर नातेवाईकांसोबत आजुबाजुचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

या घटनेमुळे लोक संतप्त झाले. बराच वेळ लोकांनी घटनास्थळी गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांची पोलिसांशी झटापटही झाली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले डीसीपी यांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. यातील एक पथक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहे. दुसरीकडे, दुसरी टीम इलेक्ट्रॉनिक टेहळणीद्वारे हल्लेखोरांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की त्यांच्यावर गोळीबार कोणी केला. नेमकी त्यांची संख्या किती होती माहित नाही. मौका मुआयना आणि लोकांशी बातचित केल्यानंतर पोलीसांनी दोनपेक्षा अधिक हो सकती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मारेकरी एकाच बाईकवर आले होते. डीसीपी ग्रामीण रवि कुमारच्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीम, सर्विलांस, क्राईम ब्रान्च, एसओजी टीम पाचारण करुन तपासणी सुरु आहे. लवकरात लवकर आपोपींना अटक करण्यात येईल.