पाच वर्षानंतर मोदी पंतप्रधान नसणार हे शहांनीच केले मान्य! चोडणकर यांचा टोला

4668

गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत बोलताना पाच वर्षानंतर नरेंद्र मोदी यांना एसपीजी सुरक्षा कवच मिळणार नसल्याचे सांगून, पंतप्रधान पदावर ते राहणार नसल्याची स्पष्ट कबुली दिली. तसेच केवळ जुमल्यांच्या आधारावर देश चालवता येत नसल्याचे भाजपला पटले आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

लोकांना खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले होते. काळा पैसा परत आणणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकणार, दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळुन त्याला हिंदुस्थान आणणार, डिमोनेटायझेशन नंतर आतंकवाद व अतिरेकी कारवाया पूर्णपणे थांबणार, घाईगडबडीत लागु केलेल्या जिएसटीनंतर देशाची अर्थव्यवस्था जगात मजबुत होणार अशी अनेक खोटी आश्वासने देत भाजपने अच्छे दिनचे स्वप्न लोकांना दाखवले. पण प्रत्यक्षात एका मागुन एक संकटे आणून लोकांची झोपच उडवली, असल्याचा आरोप देखील चोडणकर यांनी केला आहे.

girish-chodankar

आपली प्रतिक्रिया द्या