एक्स बॉयफ्रेंडची आठवण करणं पडलं महाग, झाला ब्रेकअप

1265

जोडीदारा बरोबर नात टीकवायचं असेल तर त्यात पारदर्शकता ठेवणं गरजेचं असतं असे म्हटले जाते. यामुळे बऱेच जण आपला भूतकाळ पार्टनरला सांगून मोकळे होतात. यात समोरच्या व्यक्तीने आपल्याला भूतकाळासह स्विकारावे हा उद्देश्य असतो. पण तरीही जर नकळत तुमच्या तोंडून जुन्या मित्राचा उल्लेख झाला तर त्याचा किती मनस्ताप होतो हे एका तरुणीने सोशल मीडियावर सांगत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. जेन (25) असं तिचं नाव आहे.

 सोशल मीडियावर जेनीने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मी माझ्या बॉयफ्रेंड माईकबरोबर गेल्या सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही आऊटींगसाठी बाहेर गेलो होतो. दिवसभर एकमेकांबरोबर छान वेळ घालवल्यानंतर रात्री दोघे गप्पा मारत होतो. त्यावेळी माझ्या तोंडून नकळत एक्स बॉयफ्रेंड अॅडमचे नाव निघाले. यामुळे माईकला धक्का बसल्याचे जेनीने म्हटले आहे.’

कारण गेल्याच आठवड्यात माईक आणि जेनी यांनी अॅडमचा विषय संपवण्याचा निर्णय घेतला होता. पण असे असतानाही जेनीच्या तोंडून अॅडमचे नाव निघाल्याने माईक अस्वस्थ झाला. त्यानंतर त्याने जेनीला त्याला थोडा वेळ एकटे राहायचे आहे असे सांगितले. पण नंतर त्याने जेनीशी संपर्क केला नाही. मी त्याला खूप फोन केले. माफीचे मेसेज पाठवले पण माईक प्रतिसादच देत नसल्याचे सांगत आमचे नाते संपुष्टात आल्याचं जेनीने सांगितलं आहे. त्याचबरोबर माईकवर माझे खरे प्रेम असून मी त्याच्याविणा राहू शकत नाही. त्याला परत मिळवण्यासाठी काय करू असा प्रश्न तिने यूजर्सला विचारला आहे. जेनीच्या या पोस्टला पंधरा हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर चार हजाराहून अधिक लोकांनी यावर कमेंटस करत तिला माईकच्या मनात काय चालले आहे. याबद्दल सांगत त्याला परत मिळवण्याचे प्रयत्न कर असे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या