पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉला खेळवा! सुनील गावस्कर यांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
7. पृथ्वी शॉ (हिंदुस्थान ) - 18 वर्षं 329 दिवस - वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटी

सामना ऑनलाईन, सिडनी

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला सलामी फलंदाज म्हणून संघात स्थान द्या, असे स्पष्ट मत हिंदुस्थानचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. लोकेश राहुलच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. त्यामुळे परदेशात चमकदार कामगिरी करणाऱ्या मुरली विजय याच्यासह पृथ्वी शॉला सलामीला पाठवणे योग्य ठरणार आहे. पृथ्वी शॉने मायदेशातील कसोटी मालिकेत चांगल्या धावा केल्या आहेत. तसेच न्यूझीलंडमध्येही तो छान खेळलाय. पृथ्वी आक्रमक फलंदाजी करू शकतो, तर मुरली विजय संयमी फलंदाजी करून त्याला उत्तम साथ देऊ शकतो. त्यामुळे पृथ्वी शॉची निवड हिंदुस्थानसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे सुनील गावसकर ठामपणे म्हणाले.  रोहित शर्माने गेल्या काही महिन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडलाय हे मान्य आहे; पण हनुमा विहारी याने अखेरच्या कसोटीत अर्धशतक झळकावले आहे. तसेच तो पार्टटाइम गोलंदाजीही करू शकतो.