
वाडीयापार्क येथे महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य नगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत ज्ञानसंपदा स्कूल ( इंग्लिश मिडीयम ) सावेडी शाळेच्या अंडर 17 मुलींच्या गटाने विजय मिळवला, श्री साई शाळेविरुद्ध उपांत्य फेरीत 10-1 अशी बाजी मारली. तसेच अंतिम सामन्यात जगदंबा विद्यालयाविरुदध 8- 1 असा दणदणीत विजय मिळवत जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत सुयश मिळवत लक्षवेधी कामगिरी संपादन केली. सर्व स्पर्धकांना क्रीडाशिक्षक गणेश धोटे व भाग्यश्री थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. मुलींच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर संस्थेच्या कार्यकारी शैक्षणिक सल्लागार डॉ. सुनिता भागवत तसेच संस्थेच्या विश्वस्तांनी भरभरून कौतुक केले.


























































