घाणेरडेपणा अंगाशी येणार, करण जोहरकडून गोवा सरकारने मागवला माफीनामा

गोवा सरकारने निर्माता करण जोहरला फटकारले आहे. सरकारने करणला माफी मागण्यास सांगितले असून अन्यथा दंड भरण्यास सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी करण जोहरने गोव्यातील एका गावात शूटिंग केले होते. शुटिंगदरम्यान कचरा तिथेच टाकल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून ही घटना सरकारच्या निदर्शनास आणली आहे.


गोव्या राज्यातील नेरुळ गावात करण जोहर निर्मित एका चित्रपटाचे शूटिंग पार पाडले. या चित्रपटात दिपीका पदुकोणची प्रमुख भुमिका आहे शूटिंग आटोपल्यानंतर गावात कचर्याेचा ढिगारा तसाच ठेवण्यात आला. यावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून आपला राग व्यक्त केला आहे.
गोवा राज्यातील एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाने धर्मा प्रॉडक्शनला नोटीस पाठवली आहे. याबाबत धर्मा प्रॉडक्शनने माफी मागावी अशी मागणी मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे. लोबो म्हणाले की, करण जोहर यांनी सोशल मीडियावर अधिकृत माफी मागावी, अन्यथा त्यावर दंड आकारावा लागले.

आपली प्रतिक्रिया द्या