
सणासुदीला सोनेखरेदीला महत्त्व आहे. आता गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाच्या आधीच सोने स्वस्त झाले आहे. त्यामुळे या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. आतापासून सणांना सुरुवात होत असल्याने तसेच दोन महिन्यांनी लग्नसराई सुरू होणार असल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली होती. तर या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. बुधवारीही सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोने आणखी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे.
सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 47,192 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर मंगळवारी ही दर 47,399 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजे सोन्याच्या दरात 207 रुपयांनी घट झाली आहे. तर चांदीच्या दरात काहीशी वाढ होत चांदीचे दर 64,510 रुपये प्रति किलो असे झाले आहेत. मंगळवारी चांदीचे दर 64,135 रुपये प्रतिकिलो होते.
आठवड्याभरात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाले आहेत. सोमवारी सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली होती. तर मंगळवारी या दरात घट झाली होती. आजही सोन्याच्या दरात घसरण होत सोने स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आतंराष्ट्रीय बाजापेठेची स्थिती आणि शेअर बाजाराचा प्रभाव सोन्याचांदीच्या दरावर होत असतो. सध्या शेअर बाजार तेजीत असल्याने सोन्याचांदीच्या दरात घसरण होत आहे. आगामी काळातही सोन्याचांदीच्या दरात चढउतार कायम राहतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.



























































