सोने घसरले! प्रति तोळा 39 हजार 650वर

2610
gold

जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदीची खरेदी-विक्री ठप्प झाल्याने या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. सोन्याचा भाव 40 हजारांखाली गेला आहे. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा 39 हजार 650 रुपये इतका घसरला. कमॉडिटी बाजारात सोने दोन हजार रुपयांनी स्वस्त झाले. चांदीच्या दरात तब्बल 6000 रुपयांची घसरण झाली होती. चांदीचा भाव 36 हजार 640 रुपये झाला.

मागील आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याची आयात थांबली आहे. यामुळे सराफा बाजारातील व्यवहार ठप्प आहेत, असे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले. कोरोनाचा फटका कमॉडिटी बाजाराला बसला आहे. 13 मार्च रोजी सोन्याचा भावात 2600 रुपयांची घसरण झाली होती. सोन्याचा भाव 41555 रुपयांवर पोचला होता. इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज शुद्ध सोन्याचा भाव 40,195 रुपये आहे. 23 कॅरेट सोन्याचा भाव 40,034 रुपये आहे. चांदीचा भाव 36,125 रुपये आहे, अशी माहिती दिली. येत्या काळात सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या