
गोमुत्र प्यायल्याने कोरोनाची लागण होत नाही असा दावा पश्चिम बंगालच्या भाजप कार्यकर्त्याने केला होता. म्हणून त्याने गोमुत्र पिण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु गोमुत्र प्यायल्याने एक व्यक्ती आजारी पडला आहे. याप्रकरणी आयोजक भाजप कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.
नुकतंच अखिल भारतीय हिंदू महासभेने दिल्लीत गोमुत्र पार्टीचे आयोज केले होते. या पार्टीत 200 लोक सामील झले होते आणि त्यांनी गोमुत्र प्राशन केले होते असे म्हटले जाते. गोमुत्र प्यायल्याने कोरोना होत नाही असा दावा केला होता. तसेच संपूर्ण देशात अशा प्रकारचे गोमुत्र पार्टीचे आयोजन करण्यात येईल अशी महासभेने म्हटले होते.
पश्चिम बंगालच्या एका भाजप कार्यकर्त्याने अशाच प्रकारे गोमुत्र प्राशन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हे गोमुत्र प्यायल्याने एक स्वयंसेवक आजारी पडल आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे.
कोरोनाचे औषध म्हणून विकत होता गोमुत्र
जगभरात कोरोनामुळे हजारो मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. जीव वाचवण्यासाठी लोक अफवांवरही विश्वास ठेवत आहेत. पश्चिम बंगालाच्या हुगळी जिल्ह्यात अली नावाचा व्यक्ती कोरोनाचे औषध म्हणून गोमुत्र आणि शेण विकत होते. एक लिटर गोमुत्राची किंमत 500 रुपये होती. तर एक किलो शेणाची किंमत 500 रुपये इतके आकारत होता. पोलिसांना ही बाब कळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अलीला अटक केली. अलीवर अफवा पसरवणे, लोकांना फसवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.
नुकतीच हिंदू महासभेने गोमुत्र पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतच सामुहिक गोमुत्र पिण्याचा कार्यक्रम होता. तसेच गोमुत्र प्यायल्याने कोरोना होत नाही असा दावा करण्यात आला होता. त्यामुळेच आपण हा व्यवसाय सुरू केल्याचे त्याने सांगितले.
परदेशात 276 हिंदुस्थानींना लागण
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत हिंदुस्थानमध्ये कोरोनाचे 151 रुग्ण आढळले आहेत. तर परदेशात 276 हिंदुस्थानींन कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक हिंदुस्थानी रुग्ण ईराणमध्ये आढळले आहेत. परराष्ट्र खात्याने ही माहिती दिली आहे.

























































