तो तरुण म्हणजे आपले… बाबासाहेब पुरंदरे…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाबळेश्वर स्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो होतो. बाहेर धो-धो पाऊस सुरू. पाखरंही आडोसा धरून बसलेली. खिडकीतून आत येणारे तुषार झेलत उगीचच बाहेर बघत बसलेलो. इतक्यात एवढय़ा जीवघेण्या पावसात सायकल मारत चाललेला एक जण दिसला. विचारच करीत होतो इतक्यात चेहरा दिसला. तसाच धडपडत बसमधून खाली उतरलो. धावतच जाऊन  त्या सायकलवाल्या तरुणाला आडोशाला घेतले… विचारले…

हे काय? या प्रलयपावसात कुठून आलात आणि कुठं निघालात?

चिंब भिजलेला, काकडलेला तो तरुण म्हणाला…

आप्पा… प्रतापगडावरून हडपांचा सांगावा आला, शिवकालिन पत्र सापडलंय…

लगेच या… निघालो… बससाठी पैसे नव्हते… सायकल मिळाली… लगेच निघालो… पुण्यावरून!

आप्पांनी त्या तरुणाला कडकडून मिठी मारली… कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यातलं पाणीच थांबेना…

 गो. नी. दांडेकर

 

साहित्य संपदा

  • आग्रा
  • कलावंतिणीचा सज्जा
  • जाणता राजा
  • पन्हाळगड
  • पुरंदर
  • पुरंदरच्या बुरुजावरून
  • पुरंदऱयांचा सरकारवाडा
  • पुरंदऱयांची नौबत
  • प्रतापगड
  • फुलवंती
  • महाराज
  • मुजऱयाचे मानकरी
  • राजगड
  • राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची 2014 साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार – हेमा हेर्लेकर)
  • लालमहाल
  • शिलंगणाचं सोनं
  • शेलारखिंड. (ही शिवाजी महाराजांच्या काळातील एका सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी. या कादंबरीवर अजिंक्य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला  ‘सर्जा’ हा मराठी चित्रपटही निघाला होता.
  • सावित्री
  • सिंहगड