घरबसल्या करा ताजमहालची सफर, गुगलने आणलंय नवीन टूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट आहे. लोकांना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत घरात राहावं लागतंय. या काळात घरबसल्या ताजमहालची सफर करता यावी, यासाठी गुगलने असं एक टूल आणलं आहे. गुगलचे हे नवीन फीचर वापरून कोणताही युजर घरातून ऐतिहासिक वारसा स्थळे बघू शकतो.

जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने गुगलबरोबर भागीदारी करत एक नवीन टूल सादर केले आहे. या टूलच्या मदतीने कोणताही युजर जगभरातील लोकप्रिय ठिकाणांची व्हर्च्युअल टूर करू शकतो. या मायक्रोसाईटच्या मुख्यपृष्ठास भेट दिल्यानंतर यासंदर्भातील सर्व माहिती मिळेल. वास्तू कधी बांधली, कशासाठी बांधली, कोणी बांधली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरेदेखील या साईटवर मिळतील.

‘गुगलने 10 युनेस्को हेरिटेज साइट्ससाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे, जी युजर्सना व्हर्च्युअल टूर घडवेल. त्यासाठी https://artsandculture.

google.com/story/zAUxtGbI2DyODQ या लिंकवर क्लिक करून जगभरातल्या हेरिटेज साईट्सना भेटी देता येईल.
या टूलद्वारे गुगलने सेरेंगेटी नॅशनल पार्क, कोलोसेयम आणि द योसेमाईट नॅशनल पार्कच्या व्हर्च्युअल टूरवर जाण्याची संधी दिली आहे.