आकर्षक डिझाईन, अधिक सुरक्षितता अँड्रॉईड-12 स्मार्टफोनचा चेहरामोहरा बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या वार्षिक संमेलनात नेक्स्ट जनरेशन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉईड-12 मधील फिचर्सवरून पडदा हटवला आहे. यात युजरला आकर्षक डिझाईन, जबरदस्त फिचर्स आणि अधिक प्रायव्हसी ऑप्शन मिळणार आहेत. अँड्रॉईड-12 मुळे ऑपरेटिंग सिस्टीमचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार असल्याचे बोलले जातेय.

नव्या ऑपरेटिंग सिस्टीममधे युजरला आपल्या आवडीनुसार डिझाईन बदलता येईल. वेगवेगळे अ‍ॅप वेगवेगळ्या रंगांत पाहायला मिळतील. यात कलर पॅलेट बनवता येणार आहे, तो बँकग्राऊण्डला कॉम्प्लिमेंट करू शकणार आहे. याशिवाय क्विक डिलीट, गुगल फोटोजमध्ये फोल्डर लॉक आदी फिचर मिळतील. गुगल असिस्टंटचा वापर हल्ली सर्वच करतात. पॉवर बटन लॉंग प्रेस केल्यावर गुगल असिस्टंट सुरू होईल. नवीन सेटिंगनुसार तुम्ही एक्झॅट लोकेशनऐवजी अ‍ॅप्रॉक्सिमेट लोकेशन शेअर करू शकता.

युजरचा डेटा चुकीच्या हातात जाण्यापासून वाचविण्यासाठी अँड्रॉईड-12 मध्ये प्रायव्हसी डॅश बोर्ड आणि प्रायव्हेट कॉम्युटर कोर हे फिचर मिळणार आहेत. प्रायव्हसी डॅश बोर्डमुळे 24 तासांत किती वेळा वॅâमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनचा अ‍ॅक्सेस घेतला गेला तसेच कोणत्या अ‍ॅपकडे कोणती परवानगी आहे, याची माहिती मिळणार आहे. या डॅश बोर्डद्वारे युजर कोणत्याही अ‍ॅपची परवानगी रद्द करू शकतात.