रायगडात 24 फेब्रुवारीला लोकसभेची रंगीत तालीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱया ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिह्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार असून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. काही महिन्यातच लोकसभा निवडणुका होणार असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकांना खूप महत्त्व प्राप्त झाले असून ही त्याची रंगीत तालीम समजली जात आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर ताबा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोर लावणार असल्याने ऐन थंडीत रायगडात राजकीय वातावरण तापणार आहे.

मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱया तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 24 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालाकधीत मतदान होणार असून दुसऱया दिवशी लगेच मतमोजणी करण्यात येणार आहे. 4 ते 9 फेब्रुवारी या कालाधीत उमेदवारी अर्ज दिले जातील व स्वीकारले जातील, तर 11 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे. 13 फेब्रुवारीला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.