ग्लोबल वॉर्मिंगविरोधात लढा,16व्या वर्षी नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई हिला 2014 साली लहान वयात मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्कारानंतर आता एक स्वीडिश कन्या चर्चेत आली आहे. ग्रेटा थुनबर्ग असे या 16 वर्षीय मुलीचे नाव असून तिला शांततेच्या नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळाले आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी केलेल्या तिच्या कार्याची दखल जगाने घेतली आहे.

ग्रेटाने ग्लोबल वॉर्मिंगविरोधात ‘स्कूल स्ट्राइक’ करून स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनात ग्रेटाला विद्यार्थ्यांची मोठी साथ मिळाली. या सर्वांनी मिळून जोरदारपणे अभियान राबवले होते. अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रेटाने शाळेत जाणेही बंद केले होते. शेकटी ग्रेटाची मेहनत सफल झाली. त्यानंतर हे अभियान केवळ युरोपच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय ठरलं. याशिवाय ग्रेटाने डिसेंबर 2018 मध्ये पोलंडमध्ये झालेल्या क्लायमेंट चेंज कॉन्फरन्समध्ये ग्लोबल वॉर्मिंगबाबत भाषण देऊन सर्वांना प्रभावित केले होते. लहान वयात ग्रेटाने दाखवलेली समज आणि तिचे विचार याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्यवस्थेच्या चौकटीबाहेर पडूया
नोबेलसाठी नामांकन मिळालेल्या ग्रेटाचं म्हणणं आहे की, आपण सर्कांनीच जमिनीखालील तेल आणि खनिजे सुरक्षित ठेकण्याची गरज आहे. त्यासाठी उपाय शोधले पाहिजेत. आपण व्यवस्थेच्या चौकटीत राहून उपाय शोधू शकत नाही. त्यासाठी व्यवस्था बदलणे आवश्यक आहे.