मागील भांडणाच्या कारणावरुन बामणी येथे खून, चारजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालूक्यातील मौजे बामणी येथे मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. या घटनेत चारजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंगा पोलीस ठाण्यात या खूनासंदर्भात सुनिता अर्जुन रणदिवे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीचा भाऊ विक्रम शिंदे याच्या सोबत झालेल्या मागील भांडणाची कुरापत काढून बापू उर्फ विजय ढाले, हाणमंत माणिक गायकवाड, राम हाणमंत गायकवाड, गोरख हाणमंत गायकवाड, अरविंद नामदेव गायकवाड, शशीकांत उर्फ संदेश अरविंद गायकवाड, मल्हारी रंगराव गायकवाड, दिगंबर परमेश्वर गायकवाड, शंभो मल्हारी गायकवाड, शाम नारायण गायकवाड (सर्व रा. बामणी ता. निलंगा) यांनी काठीने, दगडाने फिर्यादी सुनिता अर्जुन रणदिवे, किसन विठोबा शिंदे, लक्ष्मीबाई किशन शिंदे, स्नेहा जगन्नाथ शिंदे सर्व रा.बामणी सध्या राहणार वडगाव शेरी पुणे यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीमध्ये गंभीर जखमी होऊन जगन्नाथ किसन शिंदे हा मरण पावला. निलंगा पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.