
आपल्या लग्नात आपण सगळ्यांपेक्षा सुंदर दिसावं आणि आपला ड्रेस सर्वात हटके असावा असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. असंच काहीसं स्वप्न सायप्रासमध्ये राहणाऱया मारिया परास्केवा या तरुणीने पाहिलं होतं.
लग्नात मारियाने चक्क सात किमी लांबीचा गाऊन परिधान केला होता. तिच्या या अनोख्या गाऊनची सर्वत्र चर्चा झाली असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.
पाश्चिमात्य देशात वेडिंग गाऊनच्या मागील हिस्स्याचे म्हणजेच वेलचे खूप महत्त्व असते. जगातील सर्वात मोठा वेडिंग वेल परिधान करण्याचे मारियाचे लहानपणापासूनच स्वप्न होते. नुकतेच तिचे स्वप्न पूर्ण झाले.
मारियाच्या वेडिंग गाऊनच्या वेलची लांबी 6962 मीटर इतकी होती. म्हणजेच अमेरिकेतील 63 फुटबॉल मैदानांच्या लांबीइतकी. ग्रीसमधील एका कंपनीने मारियासाठी हा खास गाऊन तयार केला असून त्यासाठी त्यांना तीन महिन्यांचा कालावधी लागला. विवाहस्थळी हा गाऊन वेल पसरवण्यासाठी सहा तासांचा वेळ लागला. तसेच पिन लावण्यासाठी 30 जणांची टीम कार्यरत होती.


























































