
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुजरातमध्ये एकाचवेळी 4 हजारांहून अधिक लोकांनी सूर्यनमस्कार करत विक्रम केला आहे. या विक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
सोमवारी सकाळी गुजरातच्या मेहसाना येथील मोढेरा सूर्य मंदिरासह 108 ठिकाणी एकाचवेळी 4 हजारांहून अधिक लोकांनी सूर्यनमस्कार केला. हा विश्वविक्रम घडताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी हे देखील सूर्य मंदिरात उपस्थित होते. यासह गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षक स्वप्निल डांगरीकही येथे पोहोचले होते.
मोदींचे ट्विट
दरम्यान, सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, गुजरातने 2024चे स्वागत एका उल्लेखनीय पराक्रमाने केले आहे. 108 ठिकाणी एकाचवेळी सर्वाधिक लोकांनी सूर्यनमस्कार करत गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. 108 या क्रमांकाचे आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हा विश्वविक्रम घडला त्या प्रतिष्ठित स्थळांमध्ये मोढेरा येथील सूर्य मंदिराचाही समावेश असून येथे अनेक लोक सहभागी झाले. योग आणि सांस्कृतिक वारशासाठी आपल्या वचनबद्धतेचा हा खरा पुरावा आहे, असे म्हणत मोदींनी सर्वांना सूर्यनमस्कार आपल्या दिनचर्येचा भाग बनवण्याचेही आवाहन केले.
Gujarat welcomed 2024 with a remarkable feat – setting a Guinness World Record for the most people performing Surya Namaskar simultaneously at 108 venues! As we all know, the number 108 holds a special significance in our culture. The venues also include the iconic Modhera Sun… pic.twitter.com/xU8ANLT1aP
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2024



























































