
गुरुग्राममध्ये तरुणींसोबत झालेल्या छेडछाडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पीडित तरुणींमधील एका तरुणीने बनवला होता. व्हायरल व्हिडीयो स्पष्ट दिसत आहे की रात्री उशिरा आपल्या घरी परतणाऱ्या तरुणींची दोन तरुण छेड काढत होते. एवढेच नाही तर त्यांच्याशी बोलताना शिवीगाळ करत होते.
व्हिडीओ बनवणाऱ्या युवतीने दावा केला आहे की या तरुणांनी दारू प्यायली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि तरुणींची तक्रार नोंदवली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोघे आरोपी तरुण पळाले होते.
तरुणी रात्री उशिरा आपल्या घरी परतत होत्या त्यांच्या आजीची तब्येत बिघडल्याने त्या घरी जात होत्या. तरुणी कॅब पकडण्यासाठी रोडवर उभ्या होत्या तेव्हा दारु पिणाऱ्या त्या तरुणांनी त्यांना छेडण्यास सुरुवात केली. तरुण पळत मुख्य रस्त्यावर आल्या तेव्हा ते दोघे त्यांच्या मागे तिथेही पोहोचले. ते घाणेरडे शब्द वापरत होते आणि चाळे करत होते. इतकेच काय तर कॅबही जाऊ देत नव्हते.
छेडछाडीला विरोध केल्यानंतर आरोपींनी त्यांना बलात्कार करू, चेहऱ्यावर अॅसिड टाकू, आणि मारून टाकू अशा धमक्याही दिल्या.
पोलिसांनी याघटनेत आयपीसी कलम 34, 341, 354-ए, 354-डी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक धाडले असून पुढील तपास सुरू आहे.


























































