मंगळवेढा-सांगोल्यात गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात रविवारी पहाटे वादळी पाऊस आणि गारपीटीने गावांना झोडपून काढले. या वेळी वीज कोसळल्याने शेतकऱ्यांच्या दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

रविवारी पहाटे दोन ते चारच्या वाजेदरम्यान सांगोला तालुक्यातील खवासपूर, लोटेवाडी परिसरात तुफान गारपीट झाली. यावेळी बोरांच्या आकाराच्या गारांसह अवकाळी पाऊस झाला. तसेच वीज अंगावर पडल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला. तर मंगळवेढा तालुक्यातील माळेवाडी येथे वीज पडल्याने एक बैल ठार झाला. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळींब आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.