रुक्ष केसांसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ पॅक, केस होतील चमकदार

सतत प्रवास, प्रदुषण यामुळे अनेकांचे केस रुक्ष होतात. या कोरड्या केसांना चमकदार बनविण्यासाठी घरच्या घरी काही जबरदस्त उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

खोबऱ्याचे तेल आणि कढिपत्ता

कोरड्या केसांना खोबऱ्याच्या तेलामुळे ओलावा आणि कढिपत्त्यामुळे प्रोटीन मिळते, जे डॅमेज झालेल्या केसांना पुर्नजीवीत करण्यासाठी मदत करतात. तसेच कढिपत्त्यामुळे केसांचे गळणे कमी होते.

एवेकॉडा, ऑलिव्ह ऑईल आणि अंड

एवेकॉडामध्ये ओमेगा अॅसिड, व्हिटॅमिन, बायोटीन आणि अंड्यात भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे कोरड्या केसांना तजेलदार बनवण्यास हे घटक मदत करतात.

ब्लॅक टी

पोषक तत्वांनी भरलेला काळा चहा केसांना मऊ आणि मजबूत बनवण्यासाठी मदत करतो. केस काळे आणि चमकदार होण्यासाठीही ब्लॅक टी फायदेशीर आहे..

दही आणि ऑलिव्ह ऑईल

दह्यात असलेले लॅक्टिक अॅसिड केसांच्या मुळांना पोषण देऊन केस वाढण्यास मदत करतात आणि ऑलिव्ह ऑईल केसांना ओलावा कायम ठेवण्यास मदत करते.

अंड, ऑलिव्ह ऑईल आणि मध

कोरड्या केसांसाठी अंड, ऑलिव्ह ऑईल आणि मध उत्तम उपाय आहेत. अंड्यातून प्रोटीन आणि मधातून केसांना ओलावा देण्याचे काम करते.

केळं

केळ्यामध्ये केसांसाठी आवश्यक भरपूर पोषक तत्व आहेत. डॅमेज झालेल्या केसांना मुळांपासून मजबूत ठेवण्यासाठी केळं फायदेशीर आहे.

सफरचंद व्हिनेगर

सफरचंद व्हिनेगार केसांच्या त्वचेची पीएच पातळी चांगली ठेवून केसांची वाढ उत्तम होण्यासाठी मदत करतात.

बेकींग सोडा

केसांमध्ये असलेला धुळ-कोंडा घालवण्यासाठी बेकींग सोडा चांगला पर्याय आहे. हे लावल्यानंतर केसांना कंडिशनरची गरज लागत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या