अभिनेत्यांच्या निम्मेही मानधन आम्हाला मिळत नाही!

1038

बॉलीवूडमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री यांना दिल्या जाणार्‍या मानधनात मोठी तफावत आहे. अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना सिनेमासाठी निम्मेही मानधन मिळत नाही, अशी खंत आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू हिने व्यक्त केली आहे. सध्या गोव्यात सुरू असलेल्या 50 व्या इफ्फी महोत्सवातील एका चर्चासत्रादरम्यान तिने मानधनातील असमानतेवर प्रकाश टाकला आहे. अभिनेत्री या केवळ शोभेच्या बाहुल्या आहेत असा समज आता हळुहळू बदलत आहे. अनेक महिलाप्रधान सिनेमांची बॉलीवूडमध्ये निर्मिती होत आहे. अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांप्रमाणे मेहनत घेत आहे. असे असतानाही अभिनेत्रींना दिल्या जाणार्‍या मानधनाबाबत मात्र असमानता आढळते. हाच मुद्दा तापसीने समोर आणला आहे.  ए लिस्टच्या अभिनेत्रींच्या महिलाप्रधान सिनेमाचे संपूर्ण बजेट हे मुख्य अभिनेत्याचे मानधनाइतके असते याकडेही तापसीने लक्ष वेधले आहे. भविष्यात हे चित्र नक्कीच बदलेल अशी मला आशा आहे, पण हे चित्र तेव्हाच बदलेल जेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन महिलाप्रधान सिनेमे पाहतील. फक्त बॉक्स ऑफिसच हे चित्र बदलू शकतो, असेही ती म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या