कराडमध्ये ‘हर घर दस्तक’ लसीकरण मोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. लसीकरण मोहीम आणखी वेगवान करण्यासाठी “हर घर दस्तक” ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेला आणखी वेग यावा आणि लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांचे लसीकरण व्हावे म्हणून कोरोना विरोधी मेगा लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

“हर घर दस्तक” या अभियातंर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीची पहिली मात्रा व दुसरी मात्रा देत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आत्तापर्यंत लस घेतलीच नाही किंवा ज्यांना लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे अशा नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण केले जात आहे.सातारा जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. कराड शहरामध्ये वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, तालुका कार्यालय, नागरी आरोग्य केंद्र, नगरपालिका यांच्या माध्यमातून ही मोहीम सुरू असून सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे या योजनेअंतर्गत लसीकरण करण्यात येत आहे.

याप्रसंगी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, भीमराव ढमाले, दिगंबर डांगे, खाशाबा वेताळ, टीम पर्यवेक्षक पी.डी.भोसले, यु.एम.खेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत माने, डॉ.सचिन देवगावकर, एम.बी.सोनावले, यु.आर. शेळके, आशा सेविका जब्बीन बागवान, वैशाली लादे, डेटा ऑपरेटर हेमंत कोरोले उपस्थित होते.