
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईच्या मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही लोकल बऱ्याच वेळापासून स्थानकातच उभी आहे. त्यामुळे वाशी बेलापूरकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अप मार्गावर देखील परिणाम झाला असून कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला त्याचा फटका सहन करावा लागत आहे.


























































