
हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा स्थानकां दरम्यानची लोकल सेवा दोन तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मस्जिद रेल्वे स्थानकाजवळील एका भिंतीचा काही भाग कोसळला होता. त्या भिंतीचा मलबा हटवून रेल्वेने पंधरा मिनिटात रेल्वे सेवा पूर्ववत केली मात्र आता महानगरपालिकेकडून ती भिंत पूर्णपणे हटविण्यात येणार आहे. त्या कामासाठी वडाळा ते सीएसएमटी पर्यंतची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाश्यांसाठी एक महत्वाची सूचना! pic.twitter.com/NKb274UOgj
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 7, 2022


























































