
आयपीएलच्या येणाऱ्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाचे कर्णधार पद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा गेली दहा वर्षे संघाचा कर्णधार होता. दहा वर्षाच्या कारकीर्दीत पाच वेळा चषक जिंकून त्याने आपली कामगिरी दाखवून दिली होती. रोहितला कर्णधार पदावरून काढून टाकल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. फक्त चाहतेच नाही तर संघातील काही खेळाडू देखील या निर्णयावर नाराज आहेत. संघातील ज्येष्ठ फलंदाज सुर्यकुमार यादव याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
💔
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) December 16, 2023
सुर्यकुमार यादवने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हृदय तुटल्याचा इमोजी टाकला आहे. त्याची ही स्टोरी इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. चाहत्यांच्यामते रोहितचे कर्णधार पद काढून घेतल्याने सुर्यकुमार नाजार असल्याचे म्हटले जात आहे. रोहितनंतर कर्णधार पदाची जबाबदारी सुर्यकुमारला मिळण्याची शक्यता होती. बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करत आहे. मात्र हार्दिक पंड्या दोन वर्षांपूर्वी मुंबई सोडून गुजरात टायटन्स संघात गेला होता. या संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आले होते. दोन्ही हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत धडक दिली, आणि एकदा विजेते पदही पटकावले. आता तो पुन्हा एकदा मुंबईच्या संघात आला असून संघ मालकाने विश्वास दाखवत त्याच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ घातली आहे. यामुळे रोहित शर्माचे चाहते नाराज झाले आहेत. यासह संघाचे खेळाडूही सोशल मीडियावर सुचक पोस्ट करत आहेत.




























































