हरमित सिंग ठरला ‘नवकिरण श्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवकिरण मंडळाच्या ’नवकिरण श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडीफ्लेक्स जिमच्या हरमित सिंगने बाजी मारली. त्याने अत्यंत चुरशीच्या लढतीत सुरज निर्मल, उमेश गुप्ता, सचिन बोईनवाड आणि अक्षय गवाणेवर मात करत स्पर्धेचे जेतेपद संपादले.

एक लाखापेक्षा अधिक बक्षीस असलेल्या या स्पर्धेत विजेत्या हरमितला ‘नवकिरण श्री’ चषकासह 15 हजार रुपयांचे रोख इनाम देण्यात आले. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुसुदन सदडेकर, सरचिटणीस सुभाष राणे, रवींद्र चिले, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब आणि सुनील शेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

नवकिरण श्री स्पर्धेचा निकाल –
55 किलो- 1. अक्षय गवाणे, 2. ओमकार आग्रे, 3. हनुमान भगत.
60 किलो- 1. सचिन बोईनवाड, 2.राकेश आंब्रे, 3. शुभम अडांगळे.
65 किलो- 1. सुरेंद्र डंगवाल, 2. अनिल जयस्वाल, 3. प्रतीक साळवी.
70 किलो- 1. उमेश गुप्ता, 2. सॅमी खान, 3. संकेत भरम.
75 किलो- 1. सुरज निर्मल, 2. विशाला धावडे, 3. वॉली अन्सारी.
80 किलो- 1. हरमित सिंग, 2. अमित साटम, 3. प्रतिश पाटील.