एटीएम फोडणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएम मशीन फोडून पैशांची चोरी करणाऱ्या हरयाणातल्या अन्सारी मोहम्मद शरीफ (23) या सराईत चोराच्या गावदेवी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांना त्याच्याकडे 10 एटीएम कार्ड व एटीएम मशीन उघडण्याची एक लोखंडी चावी सापडली आहे.

रविवारी सकाळी  बँक ऑफ महाराष्ट्रच्या नाना चौक येथील शाखेतील एटीएम मशीन एक अज्ञात व्यक्ती पह्डत असल्याचा संदेश दक्षिण नियंत्रण कक्षाकडून गावदेवी पोलिसांना मिळाला. हवालदार नरेंद्र कांबळे हे अन्य सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले, मात्र सदरचे एटीएम मशीन हे सुस्थितीत असल्याचे आढळले. कांबळे यांनी बँकेच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून सदर प्रकार सांगितला. तसेच एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा सकाळी एक व्यक्ती एटीएमसोबत छेडछाड करताना आढळला.  याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्रीनिवास दराडे तसेच नरेंद्र कांबळे, विवेक तोडणकर, कदम, गाडेकर यांनी तत्काळ तपास सुरू केला.पोलिसांनी 135 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा आरोपी हा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेरून टॅक्सीने आल्याचे दिसले. त्या परिसरात अधिक चौकशी केल्यावर प्लाझा हाऊसमध्ये रूम घेऊन अन्सारी राहत असल्याचे आढळले. त्याच परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.