हातकणांगलेत लाचखोर तलाठ्याला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीटभट्टीसाठी लागणाऱ्या मातीच्या उत्खननासाठी रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या इंगळी येथील तलाठय़ाला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडले आहे. संतोष सुभाष उपाध्ये (रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

संतोष उपाध्ये याने तक्रारदाराकडे वीटभट्टीसाठी लागणाऱ्या मातीचे उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी ‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो लाचेची रक्कम घेऊन पळून जाऊ लागला. मात्र, अधिकाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडले.