आरोग्य, स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी रुग्णालयात विशेष समिती नेमा! हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

सरकारी रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. काही वेळेस जागेअभावी त्यांना रुग्णालयाच्या लॉबीतच उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य जपण्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वच्छता ठेवणे गरजेचे असून याकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती नेमणे गरजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले.

लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन उपक्रम या संस्थेच्या वतीने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने रुग्णालयातील अस्वच्छतेवरून नाराजी व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालये, सरकारी व महापालिका रुग्णालयातच नव्हे तर काही खासगी रुग्णालयातही अस्वच्छता आढळून येते. न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.