
सामना प्रतिनिधी । लातूर
जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. तालुक्यात सरासरी ८६ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर दाखल झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चाकूर तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
तालुक्यातील मंडळ निहाय झालेला रात्रीचा पाऊस पुढील प्रमाणे आहे. चाकूर मंडळामध्ये ८० मि. मी. वडवळ नागनाथ मंडळात ६९ मि. मी. नळेगाव मंडळामध्ये ७९ मि.मी. झरी बु. मंडळामध्ये तब्बल १२० मि. मी. तर शेळगाव मंडळामध्ये ८२ मि. मी. पाऊस झाला आहे. या पावसाने अद्यापपर्यंत तरी कुठे नुकसान झाल्याचे दिसून आलेले नाही.
जिल्ह्यातील निलंगा मंडळातही अतिवृष्टी झालेली असून तिथे ७९ मि. मी. पाऊस झाला आहे. तर रेणापूर तालुक्यातील कारेपूर मंडळामध्ये ६६ मि. मी., शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ महसूल मंडळामध्ये ११० मि. मी., अहमदपूर तालुक्यातील हडोळाती महसूल मंडळामध्ये ८७ मि. मी., उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. महसूल मंडळात १०० मि.मी. पाऊस झाला असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.































































