आला रे आला… मुंबई उपनगरात विजांच्या कडकडाटासह मान्सून बरसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या मुंबईकरांना आज पावसाने दिलासा दिला. मुंबई उपनगरात विजांच्या कडकडाट व मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, मुंलुंड, भांडूप, घाटकोपर, विक्रोळी परिसरात धुवाँधार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांची धांदल उडाली.