रत्नागिरीत पावसाचा कहर सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्याला शनिवारीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी सकाळी देखील जास्तच होता. अतिवृष्टीमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात २३९ मिलिमीटर तर राजपुरला २०५ मिलिमीटर पाऊस झालेला आहे

रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे डोर्लेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.सोमेश्वर येथे रस्त्यावर झाड पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी झाड तोडून रस्ता मोकळा केला.कासारवेली येथे मोठया प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण तालुक्यात कापसाळ ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर वडाचे झाड पडून वाहतूक एक तास ठप्प होती. झाड तोडल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. रामपूर येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी चिखल आणि पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे.