
सामना प्रतिनिधी । सातारा
सातारा तालुक्यातील बॅडवाडी, मोरेवाडी, टोळेवाडी भैरवगड, पांगारे, बोंडारवाडी, गणेशवाडी, वावदरे,सांडवली या गावात अतिवृष्टी ने लोकांची दानादान झाली, जमिनी भेगळायला लागल्यामुळे गावं खाली करण्यात आली आहेत
सर्वात जास्त भैरवगड येथील लोकांचे नुकसान झाले असून 365 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जमीन पाच फुटापेक्षा जास्त खचली अन घरेसुध्दा पडू लागली आहेत. यामुळे प्रशासनाने सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, त्याच बरोबर मोरेवाडी येथे ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांडवली गावातील जाण्याचा मार्ग बंद तर झालाच आहे तर गावाच्या वर असणारी भली मोठ्ठी दगडे कधी निसटतील आणी गाव सपाट करून जातील हे सांगता येणार नाही. रस्ता नसल्याने या लोकांना शासकीय मदत मिळण्यास अडचणी येत आहेत, प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हे गाव हलवण्याची आवश्यकता आहे.





























































