उत्तराखंडमध्ये महामार्गावर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; प्रशासनाचे चौकशीचे आदेश

बधासू (सिरसी) येथून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर तांत्रिक कारणांमुळे शनिवारी आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावर उतरवावे लागले. या आपत्कालीन लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टरमधील सर्व 5 प्रवासी आणि वैमानिक सुरक्षित आहेत. फक्त या आपत्कालीन परिस्थितीत लँडिंग करावे लागल्याने हेलिकॉप्टरचा मागील भागाचे नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे हेलिकॉप्टरचा मागील भागाचे नुकसान झाले आणि धडकेमुळे महामार्गावर उभ्या असलेल्या एका वाहनाचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने (UCADA) या प्रकरणाची दखल घेतली. या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) माहिती देण्यात आली.

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेवर होते आणि सर्व प्रवासी यात्रेकरू असल्याचे सांगितले जात आहे. लँडिंगनंतर लगेचच सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतरचा हा चौथा हेलिकॉप्टर अपघात आहे. यापूर्वी देखील केदारनाथ हेलिपॅडजवळ एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग झाले होते. त्यात एम्सचे दोन डॉक्टर आणि पायलट थोडक्यात बचावले होते. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.