
दहावी, बारावीची फेरपरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 19 नोव्हेंबरपासून ही हेल्पलाईन सुरू होणार आहे.
परीक्षेच्या भितीने विद्यार्थी मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर ऑनलाईन बहिर्गत समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक २७८८१०७५/२७८९३७५६ असे आहेत. ही हेल्पलाईन सेवा 10 डिसेंबरपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
समुपदेशकांचे नाव व मोबाईल क्रमांक
अशोक सरोदे – ९३२२५२७०७६
एस. एन. शिपूरकर – ९८१९०१६२७०
व्ही. एन. जाधव – ९८६८८७४६२३
बि.के. हयाळिज – ९४२३९४७२६६
श्रीकांत शिनगारे – ९८६९६३४७६५
स्नेहा चव्हाण – ७५०६३०२३५३
अखलाक शेख – ९९६७३२९३७०
अनिलकुमार गाढे – ९९६९०३८०२०
चंद्रकांत मुंढे – ८१६९६९९२०४
शैलजा मुळये – ९८२०६४६११५






























































