सुनील केदार यांना हायकोर्टाचा दिलासा; शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर खंडपीठाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच याप्रकरणात त्यांना जामीनदेखील मंजूर करण्यात आला आहे.

सुनील केदार 22 वर्षांपासून जामीनावर होते. त्यांनी या काळात कधी पळून जाण्याचा किंवा साक्षीदारांना धमकावण्याचा प्रकार केलेला नाही. जामीन अटींचे पालन केले असा युक्तिवाद सुनील केदार यांच्या वकिलांनी केला होता. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने केदार यांना जामीन मंजूर केला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्यासह इतरांना सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. केदार यांनी या निकालाला आव्हान देत शिक्षेला स्थगिती आणि जामीनासाठी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.

आमदारकी पुन्हा मिळणार?

उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आता सुनिल केदार यांना रद्द झालेली आमदारकी पुन्हा मिळण्याची देखील शक्यता आहे.