
बारावीची लेखी परीक्षा उद्या 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 19 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. राज्यातील एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून यात 8 लाख 21 हजार 450 मुले तर 6 लाख 92 हजार 424 मुली आहेत. एकूण 3320 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका समाजमाध्यमावर व्हायरल होऊ नये यासाठी प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ती परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरित करेपर्यंतचे मोबाईल चित्रीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.
परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे.
तोंडी, प्रात्यक्षिक, श्रेणी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 20 ते 22 मार्चदरम्यान होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
मुंबई – 022-27881075, 022-27893756
मोबाईल क्र. – 9833369330, 9819806109.



























































