हिंगोलीत पोलिसांची पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना अमानूष मारहाण

4741

हिंगोली येथील शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व सात ते आठ पोलिसांनी c आज 29 मार्च रोजी घडली आहे. या अमानुष मारहाणीनंतर खंडेलवाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किराणा दुकान व अन्य जीवनावश्यक वस्तूची दुकाने आज 29 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच नागरिकांनाही संचारबंदीच्या आदेशातून सूट देऊन जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा दिली होती. दुपारी बारा वाजता गांधी चौक भागामध्ये न्युज 18 लोकमतचे पत्रकार कन्हैया खंडेलवाल हे वृत्तांकन करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी वाहतूक शाखेचे एपीआय ओमकार चिंचोलकर व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी पोलिसांकडून सामान्य नागरिकांना मारहाण सुरू असल्याने खंडेलवाल हे व्हिडीओ चित्रीकरण करून पोलिसांकडे मारहाणीची कारण विचारण्यासाठी गेले. त्यावेळी चिंचोलकर यांनी तू नेहमीच आमच्या विरोधात बातम्या देतो असे म्हणत खंडेलवाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप खंडेलवाल यांनी केला. तसेच वाहतूक पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये नेऊन एपीआय चिंचोलकर यांनी कानशिलावर बंदूक लावून तुला जिवे मारतो असे म्हणत मारहाण केल्याचा आरोपही खंडेलवाल यांनी केला आहे. वाहतूक शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांनी धक्का दिल्यामुळे चिंचोलकर हे बाजूला झाले त्यांनी बंदूक चालवली नाही असेही खंडेलवाल यांनी सांगितले आहे. या मारहाणीमुळे खंडेलवाल यांची प्रकृती चिंताजनक असून खंडेलवाल यांच्या गुप्तांगावर देखील पोलिसांनी मारहाण केल्याचे समजते. खंडेलवाल यांचे कुटुंबीय देखील भयभीत झाले आहे.

दरम्यान, खंडेलवाल यांनीच मारहाण केल्याचा दावा चिंचोलकर यांनी केला आहे. खंडेलवाल यांनी दगडाने माझे डोके फोडले असा आरोप चिंचोलकर यांनी केला आहे. चिंचोलकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही माहिती समजल्यावर हिंगोलीतील पत्रकार मोठ्या संख्येने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार संतोष बांगर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मुख्याधिकारी रामदास पाटील , राम कदम यांनी खंडेलवाल यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार हे चिंचोलकर यांना पाठीशी घालत असल्याने त्यांची तात्काळ बदली करावी व चिंचोलकर यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या