शहाजीराजांच्या समाधीस्थळावर 450 किलोची मेघडंबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे कर्नाटकातील होदिगेरे येथील समाधिस्थळ गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावर होते. संरक्षक कवच नसल्याने ऊन, वारा आणि पावसाचा थेट परिणाम समाधीवर होत होता. याची दखल घेत पुण्यातील इतिहासप्रेमींनी ‘गनिमी कावा’ करीत एका रात्रीत साडेचारशे किलो वजनाची मेघडंबरी उभारून समाधीला संरक्षण मिळवून दिले. पुण्यातील इतिहासप्रेमींनी केलेल्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अभिमान व्यक्त केला जात आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक डॉ. गौरव घोडे यांनी पुढाकार घेत एका रात्रीत साडेचारशे किलो वजनाची मजबूत मेघडंबरी उभारून समाधीला संरक्षण मिळवून दिले.