
पाथर्डी शेवगाव रोडवर मंगळवारी पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. या अपघातात अनिकेत अकोलकर (वय 16, रा. डांगेवाडी) या विद्यार्थ्याचा मृ्यू झाला आहे.
मंगळवारी पहाटे अनिकेतसोबत त्याचे मित्र दत्तात्रय चितळे आणि आदिनाथ फुलारी पहाटे व्यायामासाठी बाहेर पडले होते. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ते पाथर्डी शेवगाव रोडवर असलेल्या हॉटेल निवारासमोर रस्त्याच्या कडेला बसले होते. या वेळी आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. तर चितळे व फुलारी हे जखमी झाले आहेत. चितळे याच्या पायाला मार लागला असून फुलारी याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरला नेण्यात आले आहे. अनिकेत येथील श्री तिलोक जैन विद्यालयात दहावीत शिकत होता.





























































