LIVE : ऐतिहासिक! कलम 370 रद्द, राज्यसभेत विभाजनाचा प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोमवारचा दिवस हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जम्मू-कश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारा कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. या संदर्भात सुरू असणाऱ्या चर्चांना अमित शहा राज्यसभेमध्ये उत्तर दिले.

  • विधेयकाच्या बाजून 125 आणि विरोधात 61 मतं पडली
  • जम्मू-कश्मीर, लडाख वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश
  • जम्मू-कश्मीर विभाजनाचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर

  • 11 नव्या राज्यसभा सदस्यांचे मतपत्रिकेद्वारे मतदान होणार
  • जम्मू-कश्मीर विभाजन प्रस्तावावर राज्यसभेत मतदार सुरू
  • राज्यसभेत आवाजी मतदानाने विधेयक मंजूर
  • जम्मू-कश्मीरमधील राजकीय आरक्षण विधेयक मंजूर
  • कश्मीर कायमस्वरुपी केंद्रशासित प्रदेश राहणार नाही, परिस्थिती सामान्य झाल्यावर पूर्ण राज्य बनवले जाईल – शहा
  • कश्मीरला 5 वर्षात देशातील सर्वात विकसित राज्य बनवणार – शहा
  • 370 कलम रद्द झाल्यास 10 टक्के आरक्षण आपोआप लागू होईल – शहा
  • कश्मीर स्वर्ग होता, आहे आणि राहिल – शहा
  • देशहिताचा निर्णय घेण्यास पंतप्रधान मोदी सक्षम आहेत – शहा
  • कलम 370 रद्द केल्यास कश्मीरमधून दहशतवाद संपेल – शहा
  • कलम 370 दहशतवादाला पूरक आहे – शहा
  • फुटिरतावाद्यांची मुलं लंडनमध्ये, कश्मीरमधील मुलं रस्त्यावर – शहा
  • कलम 370 चे समर्थन करणारे, तरुणांना भडकावणाऱ्या नेत्यांचे मुलं लंडनमध्ये विदेशात शिक्षण घेत आहेत – शहा
  • कलम 370 रद्द करण्याचे विधेयक पास होणारच, शहांचा दावा
  • पाठिंबा दिलेल्या पक्षांचे अमित शहांकडून आभार
  • कश्मीरमध्ये एकही खासगी रुग्णालय नाही, एकही खासगी मोठा डॉक्टर नाही – शहा
  • कलम 370 रद्द झाल्यास प्रत्येक मुलाला योग्य शिक्षण मिळणार – शहा
  • सरकारने 2 लाख 77 हजार कोटी रुपये जम्मू-कश्मीरला दिले – शहा
  • विरोधकांनी वोटबँकेचे राजकारण करू नये – शहा
  • जम्मू-कश्मीरमध्ये उद्योगधंदे उभारण्यास 370 अडथळा – शहा
  • भ्रष्टाचार रोखणारी यंत्रणा नसल्याने विकास झाला नाही – शहा
  • मुफ्ती, अब्दुल्ला, नेहरु कुटुंबावर शहांचा निशाणा
  • 3 कुटुंबांनी जम्मू-कश्मीरमध्ये मोठा भ्रष्टाचार केला – शहा
  • आम्ही धर्माचं राजकारण करत नाही, शहांचे राज्यसभेत उत्तर
  • 370 कलम महिला आणि दलितविरोधी – अमित शहा
  • कश्मीरमध्ये फक्त मुस्लिम नाही – अमित शहा
  • 370 आणि 35 अ कलमामुळे जम्मू-कश्मीर कंगाल झाला – अमित शहा
  • 370 कलमामुळे कश्मीरला काहीही मिळाले नाही – अमित शहा
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत उत्तर देण्यास उभे राहिले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उपस्थित