‘फ्रेंड्स’ मालिकेतून खळखळून हसवणाऱ्या मॅथ्यू पेरी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलीवूडची लोकप्रिय टीव्ही मालिका ‘फ्रेंडस’ फेम मैथ्यू पेरी यांचे (Mathew Perry) शनिवारी निधन झाले. वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅथ्यू हे त्यांच्या लॉस एंजेलिस अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. टीएमझेडच्या रिपोर्टनुसार, मॅथ्यू पेरी याचं निधन हॉट टबमध्ये बुडून झालं आहे. मॅथ्यू पेरी यांच्या जाण्याने हॉलीवूड आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. या यादीत करीना कपूरपासून ते सिद्धार्थ मल्होत्रापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. अभिनेता रणवीर सिंगनेही एक फोटो पोस्ट करून मॅथ्यू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘फ्रेंड्स’ हा 90 च्या दशकातील फेमस शो होता

मॅथ्यू पेरीने 90 च्या दशकात जगातील टॉप कॉमेडी शो ‘फ्रेंड्स’च्या 10 सीझनमध्ये काम करून भरपूर लोकप्रियता मिळवली. त्यांनी 234 एपिसोडमध्ये शँडलर बिंजची भूमिका साकारली होती. तो कॅनेडियन-अमेरिकन अभिनेता होता. ‘फ्रेंड्स’ हा मॅथ्यू पेरीसाठी करिअर चेंजर शो ठरला आहे. या आधी आणि नंतर त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं.

अंमली पदार्थांचे व्यसनामुळे करिअरला ब्रेक

1994 ते 1998 दरम्यानचा काळात मॅथ्यू त्याच्या करिअरच्या यशाच्या शिखरावर होता, पण या काळात त्याच्या ड्रग्जच्या व्यसनाने ते हैराण झाला होते. यादरम्यान त्यांचे वजन झपाट्याने कमी होऊ लागले. 2021 मध्ये फ्रेंड्स रीयुनियन दरम्यान मॅथ्यूने सांगितले होते की शोच्या पहिल्या काही सीझनमध्ये तो ड्रग्सच्या आहारी गेला होता. यामुळे त्यांना अनेकवेळा पुनर्वसनासाठी दाखल करावे लागले. मॅथ्यू म्हणाले की मला दारू आणि ड्रग्जचे भयंकर व्यसन आहे. मी यातून बाहेर पडू शकलो नाही.

मॅथ्यू पेरीचे वडील देखील होते अभिनेते

मॅथ्यू पेरीचे सावत्र वडील डेटलाइनचे कीथ मॉरिसन हे आहेत. त्याचे खरे वडील जॉन बेनेट पेरी हे एक अभिनेता आणि मॉडेल होते. मॅथ्यू पेरीच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा त्यांनी 1979 मध्ये त्यांच्या वडिलांच्या पोलिस शो ‘240-रॉबर्ट’ मध्ये पाहुण्याची भूमिका केली. मॅथ्यू पेरी किशोरवयात असताना लॉस एंजेलिसला गेले. 1987 ते 1988 या कालावधीत ‘बॉईज विल बी बॉईज’ मध्ये चेस रसेलची भूमिका करून त्यांनी ओळख मिळवली.